महात्मा बसवेश्वर जयंती निमीत्त उत्सव समितीची पूर्वतयारी बैठक संपन्न

परभणी – परभणी शहरात क्रांतीसुर्य जगद्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या 894 व्या जयंती निमित्त ध्वजवंदन आणि अभिवादन सोहळा बुधवार दि. 30 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात संपन्न होणार आहे. याकरिता पुर्वतयारी बैठक संपन्न झाली. याप्रसंगी शिवा अखिल भारतीय युवक संघटनेचे राज्य सरचिटणीस धन्यकुमार शिवणकर यांनी समस्त समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष रामेश्वर कुबडे, शहराध्यक्ष कोंडीराम नावकीकर, कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष माधव सोनटक्के, गुलाब बिडकर, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख जनार्दन खाकरे, संदीप लकडे, शिवलिंग खापरे, संभाजी शेवटे, मयूर पेटे, अंबादास वाकोडे आदी शिवा संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ही उपस्थित होते.

Comments (12)
Add Comment