परभणी – महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या करिअर कट्टा उपक्रमांतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट प्राचार्य म्हणून डॉ. बाळासाहेब जाधव यांना सोमवार (ता.१७) रोजी नांदेड येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सदरील पुरस्कार वितरण कार्यक्रम नांदेड येथील शंकरराव चव्हाण मेमोरियल सभागृहात पार पडला. पुरस्काराचे वितरण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ. किरणकुमार बोंदर, माजी मंत्री डी. पी. सावंत तसेच महाराष्ट्र राज्य माहिती व तंत्रज्ञान सहाय्यता केंद्राचे अध्यक्ष यशवंत शितोळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट विभागीय समन्वयक म्हणून डॉ.सतीश चव्हाण, उत्कृष्ट जिल्हा समन्वयक म्हणून डॉ.दिगंबर रोडे यांनी कार्य केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नांदेड परिक्षेत्रातील चारही जिल्ह्यांचे प्राचार्य, करिअर कट्टा विभागीय समन्वयक, जिल्हा समन्वयक, तालुका समन्वय आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आ. प्रकाशराव सोळुंके, सरचिटणीस आ.सतीशराव चव्हाण, महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य डॉ.रोहिदास नितोंडे,गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.उत्कर्ष किट्टेकर, प्रबंधक विजय मोरे आदींनी अभिनंदन केले.