खडकवासला, प्रतिनिधी – नुकत्याच झालेल्या गणेशोउत्सव काळात प्रभाग क्रमांक १७ मध्ये नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे व शेखर चिंचवडे युथ फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून घरगुती गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या सजावट स्पर्धेत एकूण २७० महिला भगिनींनी सहभाग नोंदवला काल काशिधाम मंगल कार्यालय येथे बक्षिस वितरण समारंभ चिंचवड चे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या सुविद्य पत्नी सौ. अश्विनीताई जगताप, पिंपरी चिंचवड शहराच्या महापौर सौ. उषाताई उर्फ माई ढोरे, उपमहापौर सौ हीरानानी घुले, नगरसेविका सौ. अश्विनी गजानन चिंचवडे, नगरसेविका सौ.उषाताई मुंढे,नगरसेवक मोरेश्वर शेडगे, प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प सुप्रिया ताई साठे यांच्या उपस्थितीत व शुभहस्ते पार पडला. यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान नगरसेविका सौ. करुणा शेखर चिंचवडे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
सोन्याचे पेंडंट, चांदीचे पूजा साहित्य आणि मानाची पैठणी असे बक्षिस स्वरूप असलेल्या स्पर्धेचे विजेते प्रथम क्रमांक :- सौ राजश्री किशोर कोंढाळकर, द्वितीय क्रमांक :- सौ. इंदू सोमनाथ झोळ,तृतीय क्रमांक :- संगीता सर्जेराव दराडे , चतुर्थ क्रमांक :- सौ. वैष्णवी मुकुंद नलावडे, पाचवे :- सौ. रेश्मा उत्तम चव्हाण या भगिनी बक्षिसाच्या मानकरी ठरल्या, विजेत्यांना महापौर सौ. माई ढोरे, सौ. अश्विनी ताई जगताप आणि इतर मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परीक्षक सौ. आशाताई सुधीर चिंचवडे, सौ. रोहिणीताई माने, सौ. विद्या महाजन,सौ. चैत्राली ताई पडवळ,सौ. नीलम चिंचवडे, सौ. वैशाली कदम, सौ. सोनम चिंचवडे, कु सोनम थिगळे, कु. कामिनी सातपुते, विशाल वाणी, कृष्णा वाघमारे, स्वप्नील शिंदे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रास्तविक शेखर बबनराव चिंचवडे यांनी केले व आभार राजेंद्र चिंचवडे यांनी मानले.