महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त पूर्णेत शोभायात्रा

केदार पाथरकर
पूर्णा,दि 01 ः
भारतीय लोकशाहीचे जनक,समतानायक, स्त्रीउध्दारक,विश्वगुरु,लिंगायत धर्मसंस्थापक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती बुधवारी ३० एप्रिल रोजी शहरात शोभायात्रा काढुन अत्यंत धार्मिक व उत्साहपुर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
पूर्णा शहरात मागील अनेक वर्षांपासून येथील समाज बांधव मोठ्या उत्साहात जयंतीचे आयोजन करतात.या वर्षी देखील बुधवारी जयंतीचे आयोजन करण्यात आले होते.येथिल महात्मा बसवेश्वर यांच्या नियोजित पुतळ्याच्या जागेत फुलांसह रंगीबेरंगी  लायटिंग टाकुनी आकर्षक सजावट करण्यात आली होती.सकाळी ८ वाजता पूर्णेचे ग्रामदैवत श्री.गुरुबुध्दी स्वामी मठसंस्थान येथे महात्मा बसवेश्वर यांच्या रथात मांडलेल्या भव्य प्रतिमेचे पूजन  उपस्थित मान्यवरांनी केले.यानंतर मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.डिजे,बँड,ह्या आधुनिक वाद्यांना फाटा देत शहरातील विविध चौकातील महापुरुषांच्या स्मारकाला अभिवादन करत,महात्मा बसवेश्वरांच्या जयघोष आणि त्यांच्या विचारांचाप्रसार करत ही मिरवणूक मुख्य बाजार पेठेतील बसवेश्वरांच्या स्मारका जवळ पोहोचली.मिरवणुकीत बालकलाकार नक्ष एकलारे याने महात्मा बसवेश्वर यांचा सजीव देखाव्याचे सादरीकरण करत आपल्या वाणीतून बसवांना च्या जीवन चरित्राला उजाळा देण्याचं मार्गदर्शन केलं. व त्यांच्या नामाचा जयघोष केला.
पारंपरिक वाद्ये शिस्तबद्ध मिरवणूक बसवेश्वरांचा जयघोष करीत ही शोभायात्रा येथील बसवेश्वर स्मारकाजवळ पोहचली. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी बसवेश्वरांना अभिवादन केले. यावेळी असंख्य लिंगायत समाजबांधव मान्यवर उपस्थित होते.पो.नि.विलास गोबाडे यांनी यावेळी मोठा बंदोबस्त तैनात केला होता.
Comments (0)
Add Comment