प्रा. संदीप शिंदे यांना डॉक्टरेट पदवी प्रदान

परभणी,दि 03ः
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांच्यातर्फे प्रा. संदीप शिंदे यांना छत्रपती संभाजी महाराजावरील इतिहास लेखनाचा चिकित्सक अभ्यास या विषयांमध्ये संशोधन केल्याबद्दल डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी म्हणजेच डॉक्टर पदवी 29 जानेवारी 2025 रोजी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन आणि कुलगुरू डॉ मोहन चासकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली.याबद्दल त्यांचा लिमला येथील गावकऱ्यांच्या वतीने तसेच मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करण्यात आला. अवघ्या तिसाव्या वर्षी त्यांनी हे यश संपादन केले आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे….!

Comments (0)
Add Comment