परभणी,दि 04 ः
ज्ञानोपासक महाविद्यालय परभणी येथे भौतिकशास्त्र विभागप्रमुख प्रा. पवन सुरेशराव कच्छवे (रा. इंदेवाडी) यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड द्वारे संशोधनाबद्दल दिली जाणारी व शिक्षण क्षेत्रातील सर्वोच समजली जाणारी डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (पिएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ.पवन कच्छवे यांनी श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथील उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास केशट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकशास्त्रातील “अल्ट्रासॉनिक ध्वनिलहरी” या विषयावर संशोधनपर प्रबंध नांदेड विद्यापीठाला सादर केला होता आणि आज त्यांनी मौखिक चाचणी यशस्वीरीत्या देऊन डॉक्टरेट पदवी प्राप्त केली आहे.
त्यांनी त्यांची सर्वोच्च शैक्षणिक पदवी त्यांच्या कुटुंबाला आणि सर्व शिक्षकांना समर्पित केली आहे.
डॉ. पवन यांचा यशाबद्दल ज्ञानोपासक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. गणेशराव दुधगावकर, सचिव सौ. संध्याताई दुधगावकर, सहसचिव इंजि. समीरभाऊ दुधगावकर तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबर व श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव यांनी अभिनंदन केले.