जिल्हा परिषदेत सेल्फी पॉईंटच्या माध्यमातून मतदानाची जनजागृती

परभणी,दि 11 ः जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतींमध्ये मतदान विषयक व्यापक जनजागृती साठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक सेल्फी पॉईंट उभारण्यात आला आहे.ययाचे उदघाटन नतिषा माथूर यांच्या हस्ते सोमवार (दिनांक 11) करण्यात आले.

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे.मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभाग घ्यावा यासाठी व मतदानाचा टक्का वाढावा म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय, मनपा प्रशासन, पोलिस प्रशासन प्रयत्नशील आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेने देखील पुढाकार घेतला असून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिषा माथूर यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतींमध्ये मतदान विषयक व्यापक जनजागृती साठी मुख्य प्रवेशद्वाराजवळ आकर्षक सेल्फी पॉईंट चे आयोजन करण्यात आले आहे. या सेल्फी पॉईंट चे उद्घाटन सोमवारी सकाळी सीईओ नातिषा माथूर यांच्या हस्ते झाले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, स्वच्छ भारत मिशन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवराज केंद्रे, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता दिनकर घुगे, शिक्षणाधिकारी (मा) आशा गरुड, शिक्षणाधिकारी (प्रा) सुनिल पोलास, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. संजयकुमार पांचाळ, डॉ. रावजी सोनवणे, बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मोहन बुरंगे व बहुसंख्येने जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment