पाथरी / प्रतिनिधी – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य राष्ट्र उभारणीसाठी व समाज उभारणीसाठी अत्यंत मोलाचे ठरले, युवकांनी त्यांच्या जीवन चारित्र्यातून निश्चितच प्रेरणा घ्यावी. अशा अनेक प्रेरणादायी बाबी आहेत. असे प्रतिपादन सौ.भावनाताई नखाते यांनी केले
परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे शांताबाई नखाते विद्यालय,शिवाजीनगर पाथरी ता.पाथरी जि. परभणी येथे शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्षा सौ.भावनाताई अनिलराव नखाते या उपस्थित होत्या, कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून मौर्य क्रांती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष बलभीम माथेले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पर्यावरण जलस्त्रोत ,शिक्षण ,समाज उपयोगी कायदे, युद्धनीती, अध्यात्म, वनसंवर्धन इत्यादी क्षेत्रामध्ये अहिल्यादेवींनी भरीव व अद्वितीय कार्य केले असल्याचे सांगितले.
प्रमुख पाहुणे म्हणून संतोष देशमुख सौ. कावेरी माथेले, परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उपाध्यक्षा मंगलताई सुरवसे, पाथरी तालुका अध्यक्षा गीताताई कुटे,पाथरी शहराध्यक्षा रेणुकाताई सावळे, मुख्याध्यापक यादव एन.ई., प्राचार्य किशन डहाळे, प्र.मुख्याध्यापक प्रकाश रोकडे ,उपमुख्याध्यापक आर. जे. गुंडेकर.आदी उपस्थित होते. पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर प्रसिद्ध व्याख्याते यांनी यथोचित प्रकाश टाकला.
याप्रसंगी दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला, शिवाजीनगर पाथरी परिसरामध्ये वृक्षारोपण व स्वच्छता कार्यक्रम करण्यात आला.
कार्यक्रमास गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते