पुर्णा उपनिबंधक कार्यालयात सावळा गोंधळ,विजेअभावी कामकाज दोन दिवस ठप्प

पुर्णा… केदार पाथरकर, तालुका प्रतिनिधी
पुर्णा शहरातील तहसील कार्यालयाच्या इमारतीत असणारे उपनिबंधक कार्यालय असून अडचण नसून खोळंबा अशा प्रकारे येथील ढिसाळ कारभार कालच्या प्रकरणावरून चव्हाट्यावर आलाय.
दरम्यान दि.09जानेवारी रोजी सकाळी 10वाजेपासून नागरिक सदर कार्यालयातील विज पुरवठा बंद असल्याने दिवसभर उपाशीपोटी संध्यकाळी 05 वाजेपर्यंत आतातरी विज येईल या आशेने वाट बघत बसले, संध्यकाली 5नंतर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दिवसभर ताटकळत बसलेल्या नागरिकांना उद्या येण्याचे फर्मान धाडले, यावर संतप्त नागरिकांनी आमच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला तेंव्हा दुसरे दिवशी म्हणजे दि 10जानेवारी रोजी 11.30वाजेपर्यंत सुद्धा कुणीही जवाबदार अधिकारी कार्यालयात फिरकला नाही त्यानंतर दुपारी 12वाजेपासून वीजपुरवठा सुरळीत झाल्यावर कामकाज सुरु झाले होते, पण तालुक्यातील महत्वाचे, नागरिकांना वारंवार विविध शासकीय कामासाठी दररोज हेलपाटे घालावे लागत असल्याने तिथे साधी पर्यायी वीजपुरवठा व्यवस्था नसू नये? हे सुध्दा एक कोडेच म्हणावे लागेल.
सदर कार्यालयात नेहमीच इंटरनेट सुविधा खंडित होत असते त्यावर सुद्धा प्रशासनाने गांभीर्य पूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे, तर कार्यालय परिसरातील कामासाठी आलेल्या नागरिकांनी ह्या कार्यालयातील कामे हे फाईल वर वजन ठेवल्याशिवाय होत नसल्याचे देखील सांगितले, तर येथे फाईल पुढे सरकवण्यासाठी दोन ते तीन खाजगी ईसम कार्यरत असून त्यांच्यामार्फत काम दिल्यास तत्काळ प्रभावाने तुमचे काम मार्गी लागते असेही उपस्थित नागरिकांनी यावेळी स्पष्ट केले.
एकूण या अनदोंगी कारभारविरोधात नागरिक जिल्हा निबंधक यांचेकडे लवकरच तक्रार करणार असल्याचे देखील कळते.
चौकटीतील मजकूर….
या प्रकाराविषयी उपनिबंधक श्रेणी -1 श्रीमती एस. एम शेख यांच्याकडे संपर्क साधला असता त्यांनी वरिष्ठ कार्यालयात इन्व्हर्टर आणि प्रिंटर पुरवण्यासाठी मागील एका महिन्यापासून मागणी केल्याचे सांगितले, पण वरिष्ठ कार्यालयाकडून कुठलाही प्रतिसाद भेटला नाही त्याला आम्ही काय करु शकतो असे उत्तर दिले इंटरनेट चे कनेक्टिव्हिटी कधी कधी गायब होत असते त्यावर हि काम सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले, तर नागरिक काल दिवसभर ताटकळले कशामुळे ह्यावर बोलण्यास त्यांनी नकार दिला

Comments (0)
Add Comment