अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी भारतील रेल्वेत केलेल्या बदलांची माहिती दिली. रेल्वेने सुरु केलेली वंदे भारत एक्स्प्रेस चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे कोच आलिशान आहे. त्याचप्रमाणे आता इतर रेल्वे गाड्यांच्या कोचची निर्मिती करण्यात येणार आहे. आता भरतीय रेल्वेचे 40 हजार नॉर्मल रेल कोच वंदे भारतमध्ये बदलण्यात येणार आहे.
४० हजार रेल्वेबोगींचे वंदे भारत दर्जात रुपांतर होईल. नमो भारत आणि मेट्रोमुळे शहरांतील अंतर कमी झाले आहे. या दोन्ही रेल्वे सेवांचा विस्तार केला जाईल. प्रवासी गाड्यांच्या संचालनात सुधारणा होईल, तसेच प्रवाशांची सुरक्षा वाढून प्रवासाचा वेगही अधिक होईल. मेट्रोचे जाळे वाढवण्यावर सरकारचा भर राहील, असे निर्मला सीतारमन यांनी सांगितले. दुसरीकडे, वीजेवरील बसेसना प्राधान्य देण्यात येणार असून जास्तीत जास्त चार्जिंग स्टेशन्ससाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्या म्हणाल्या.
देशात नवीन १४९ विमानतळ उभारणार असून ५१७ नवे विमानमार्ग प्रस्तावित आहेत. विमान वाहतूक क्षेत्राचा मागील १० वर्षांत कायापालट करण्यात आला असून येत्या काही वर्षांत विमानतळांची संख्या दुप्पट होणार असल्याचंही त्या म्हणाल्या.