राजेंद्र गहाळ यांचा भूमिजन साहित्य पुरस्काराने सन्मान

परभणी,दि 15 ः
भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद छत्रपती संभाजी नगर व एकता फाउंडेशन व महाराष्ट्र राज्य आणि सिध्देश्वर संस्थान यांच्या वतीने सहाव्या भूमिजन साहित्य संमेलनात ग्रामीण कथाकार राजेंद्र गहाळ यांचा भूमिजन साहित्य पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
शिरूर कासार येथे गुरुवारी भाषा, साहित्य, संस्कृती आणि संशोधन परिषद व एकता फाउंडेशन यांच्या वतीने सहावे भूमिजन साहित्य संमेलन संपन्न झाले ज्येष्ठ साहित्यिक डॉ.वासुदेव मुलाटे अध्यक्षस्थानी होते तर उद्घाटक डॉ.भास्कर बढे व स्वागताध्यक्ष स्वामी विवेकानंद शास्त्री तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष रोहिदास पाटील शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते व लेखक तिफनकार डॉ. शिवाजी हुसे,पत्रकार राजा पुजारी, भाषा साहित्य संस्कृती आणि संशोधन परिषदेचे अध्यक्ष डॉ. सर्जेराव जिगे पाटील,पत्रकार सूर्यकांत नेटके, डॉ. विठ्ठल जाधव, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. अशोक घोळवे, मल्हारी खेडकर, कवी अनंत कराड, पत्रकार गोकुळ पवार, कैलास तुपे आदी मान्यवर उपस्थित होते.
संमेलनात भूमिजन जीवन गौरव पुरस्कार,उत्कृष्ट साहित्य पुरस्कार, उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार देण्यात आले.भूमिजन जीवन गौरव पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक रा.रं.बोराडे यांना तर उत्कृष्ट साहित्य पुरस्कार कथाकार राजेंद्र गहाळ यांच्या पोशिंदा कथासंग्रहास आणि उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक सकाळ अग्रोवनचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संमेलनाध्यक्ष डॉ. वासुदेव मुलाटे अध्यक्षीय भाषणात म्हणाले मातीत कसदार पणा असेल तर माळरानावरही पीक येते भूमिजन साहित्य संमेलन ही भूमिका ग्रामीण जीवनाशी निगडित आहे आता ग्रामीण भागातूनही अनेक लेखक लिहू लागले आहेत त्यांच्या लिखाणात शेतकरी कष्टकरी गोरगरीब यांचे दुःख येत आहे.
राजेंद्र गहाळ यांना राज्यस्तरीय भूमिजन साहित्य पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

Comments (0)
Add Comment