वाचन संस्कार सर्वांत महत्त्वाची गरज आहे-विजय गायकवाड.

सेलू,दि 14 ः
आपल्या जीवनात शरीर जेवढे महत्वाचं आहे तेवढीच त्या शरिरातील सर्व अवयव रक्त वाहिन्या आणि प्रत्येक पार्ट जपण्यासाठी आपण वाचन केले पाहिजे. आपल्या शरीर रचना हि अभ्यासक्रम वाचून उमगते त्यासाठी वाचन महत्वाचे होय. मला वेळ नाही माझ्याकडे पैसा नाही मी कसं वाचन करणारं ? हा प्रश्न नाही तर हि पळवाट आहे.आपण जीवन जगण्यासाठी आवश्यक ती धडपड करत असतो . आपल्या गरजा पूर्ण करतो तशीच वाचनाची गरज पुर्ण करण्यासाठी आपली धडपड असली पाहिजे.पैसा हा व्यवहार अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी गरजेचा असतो. “द ओल्ड मॅन द सी.अर्थात एका कोळीयाने” या पुस्तकांवर आपले विचार मांडताना विजय गायकवाड हे बोलत होते.
समाजात वावरताना अनेक व्यक्ती भेटत असतात वेगवेगळ्या विषयांवर चर्चा संवाद करतांना आपण पाहतो. परंतु वाचन या विषयावर कोणीही बोलताना आपल्याला पाहायला मिळतं नाही. आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत जेवताना या विषयावर बोललं जावं या मताचा मी आहे. शिक्षण अल्प असले तरी वाचनाने माणूस मोठा होतो .त्याग आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व जपण्यासाठी वाचन संस्कार सर्वांत महत्त्वाचा वाटतो. असं प्रतिपादन विजय गायकवाड यांनी स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे आयोजित एक दिवस एक पुस्तक या उपक्रमांत केले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना नागनाथ गुरू विडोळीकर म्हणाले पुस्तकं वाचायला हवीत.वाचन माणसाला समृद्ध करते , ज्ञानसंपन्न , सुसंस्कृत,संस्कारक्षम, व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी वाचन महत्वाचे होय. ग्रंथ पुजनासाठी नसतात तर वाचून बोध व प्रेरणा घेण्यासाठी असतात. खरं तर वाचन संस्कारावर अर्धातास बोलताना काय बोलावं आणि काय नाही हे अवघड आहे. परंतु समोरच्या श्रोत्यांची मानसिकता ओळखून बोलतो तो खरा वक्ता असतो .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शरद ठाकर सुत्रसंचलन कुं . आर्या विजय ढाकणे, आभार प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय विटेकर, रविंद्र मुळावेकर, माधव गव्हाणे, विजय ढाकणे, महादेव आगजाळ पंडित जगाडे अनिरुद्ध टाके यांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपाध्यक्ष एम आर पटेल, विजय गायकवाड, प्राचार्य डॉ शरद कुलकर्णी, आर्या ढाकणे इत्यादी…
गंगाधर गुंजंकर, भालचंद्र कोठेकर, रामराव बोबडे , सुरेश हिवाळे, रामराव गायकवाड, डॉ सुरेश उगले , डॉ काशिनाथ पल्लेवाड, डॉ.राजाराम झोडगे, विनायक कुलकर्णी, अमोल बिडवे,गोविंद सोळंके, दादासाहेब बोंबले, दादाराव गजमल,लक्ष्मण गाडेकर, प्रा.अनंत मोगल, प्रकाश धामणगावकर, आनंद देशमुख, अश्विनी ढाकणे माधुरी अचिंतलवार, घोडके तुळशीराम ,मगर सोपान, ताजने दादाराव इत्यादी.

Comments (0)
Add Comment