परभणी / प्रतिनिधी – आजचा तरुण वर्ग वाचना पासून दूर जात आहे. ही बाब लक्षात घेता युवकांनी वाचनातून आपल्या व्यक्तीमत्त्वाचे भरणं पोषण साधत सकारात्मक सामाजिक प्रबोधना साठी वाचनाचा व्यासंग वाढवत नेत वाचन संस्कृती वाढीस लावावी असे आवाहन वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचे उदघाटन प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले यांनी केले.
कै.सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात मॉं जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रम. वाचन संकल्प महाराष्ट्राचा या शासकीय उपक्रमाचा शुभारंभ प्रसंगी उदघाटक प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले बोलत होते. यावेळी आयोजित ग्रंथप्रदर्शन आणि वाचन संकल्प उपक्रमाचे उदघाटन रिबीन कापून व जिजाऊ माँ साहेब, सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आले.
या उपक्रमात १ जानेवारी ते १५ जानेवारी २०२५ दरम्यान ३ जानेवारी रोजी ग्रंथप्रदर्शन, वाचन अभिरुची वाढीस लावण्या साठी विद्यार्थीनींनी ग्रंथालयातून आपल्या आवडीचे पुस्तक घेऊन वाचन करुन त्याचे परिक्षण करणे,वाचन कार्यशाळा,कथन कौशल्य, वाचन संवाद सामूहिक वाचन व वाचनाचे महत्त्व लोकांना पटवून देणे.आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्राचार्यांच्या मार्गदर्शनात उपप्राचार्य डॉ संगीता आवचार, वाचन संकल्प महाराष्ट्राचा परभणी जिल्हा समीतीचे प्रा.अरुण पडघन,रासेयो परभणी जिल्हा समन्वयक.रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नसिम बेगम, स्त्री अभ्यास केंद्राच्या प्रा.डॉ.संगीता लोमटे,ग्रंथालय विभाग प्रभारी प्रा.निर्मला जाधव,अनिल नायडू ,काशीराम कानकुडकेवार ,पठाण आदींसह ८७ विद्यार्थीनींनी वाचन करत योगदान दिले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नसिम बेगम यांनी तर आभारप्रदर्शन प्रा.डॉ.संगीता लोमटे यांनी केले.