ज्ञानाच्या निकोप वाढीसाठी वाचन संकल्प आवश्यक–हरिभाऊ चौधरी

 

सेलू / प्रतिनिधी – ज्ञानाच्या कक्षा रूंदवण्यासाठी वाचन संस्कार जपणं गरजेचे. वाचन हे माणसाचे अंतर्मन सुसंस्कृतआणि व्यक्तिमत्त्वाला उभरी देते. विद्यार्थी दशेत वाचन संस्कार जपणं महत्वाचं आहे त्यामुळे आपलं व्यक्तित्व हे इतरांपेक्षा वेगळे असते. खरं तरं पुस्तक वाचताना आपण त्यातल्या चांगल्या व वाईट लिखाणावर आत्मकेंद्रित होऊन आपल्या हिताचं काय चांगलं काय वाईट आहे हे शोधणे म्हणजे वाचन होय. आपल्याला जर ज्ञानवंत, ज्ञानाधिष्ठित व्यक्तिमत्त्व खुलविण्यासाठी वाचन केले पाहिजे.

 

आपण थोर पुरुष व महापुरुषांची व्यक्तीचरित्र वाचलं तर आपल्याला नक्कीच त्यातून बोध घेता येईल. हि माणसं वाचन आणि कष्टातून उभी राहिली म्हणून थोर व महापुरुष झाली. आपल्याला देखील थोर व्यक्तिमत्त्व प्राप्त करण्यासाठी वाचन करावं लागणार आहे. तेंव्हा अशा उपक्रमांतून आपण पुस्तकांशी मैत्री करणं आवश्यक . असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा २०२५ या उपक्रमात अंतर्गत ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी हरिभाऊ चौधरी यांनी केलं.

 

या प्रसंगी सौ.अवचार मॅडम,कुं…… ग्रंथपाल महादेव आगजाळ यांनी ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्याचा हेतू वाचन आणि वाचन संस्कार अंगिकारण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन आयोजित केले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रंथालयाचे अध्यक्ष महेश खारकर हे होते.
ग्रंथ प्रदर्शनाचे सतत तीन दिवस चालणाऱ्या ग्रंथ प्रदर्शनाला शहरातील यशवंत माध्यमिक. विद्यालय , कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय, केशवराज बाबासाहेब माध्यमिक विद्यालय या शाळांनी भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थी व विद्यार्थिनी सह पुढील शिक्षक व शिक्षिका सौ.धनश्री देशमुख,सौ.आवचार मॅडम, पांडुरंग पाटणकर, दिपक गजभारे, आरेवाड , किशोर खारकर , गणेश शिंदे, इत्यादी.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव चंद्रशेखर मुळावेकर तर सुत्रसंचलन अजित मंडलिक आभार गंगाधर गुंजकर आणि संजय विटेकर यांनी मानले.

Comments (0)
Add Comment