परभणी,दि 09 ः
राज्य बियाणे उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या शेती पिकांचे पाच वाण आणि भाजीपाला पिकांचे दोन वाण असे एकुण सात वाणास केंद्रीय बियाणे समिती (भारत सरकार) यांना अधिसुचित करण्याची शिफारस करण्यात आली. यामध्ये सात वाणात सोयाबीनचे एमएयुएस ७३१, अमेरिकन कापुसाच्या एनएच ६७७, हरभरा देशी वाण परभणी चना १६, खरीप ज्वारीच्या परभणी शक्ती, तीळ पीकाच्या टिएलटी १० तसेच मिरचीचा पीबीएनसी १७ व टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० याचा समावेश आहे.
राज्य बियाणे उपसमितीची ५३ वी बैठक दिनांक ८ फेब्रुवारी रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सीगद्वारे राज्याचे अप्पर मुख्य सचिव (कृषि) मा. श्री अनुप कूमार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यामध्ये
शि़फारसीत करण्यात आलेले वाण आणि मुख्य वैशिष्टे
सोयाबीनचा एमएयुएस ७३१ हा वाण अधिक उत्पन्न देणारा (हेक्टरी २८ – ३२ क्विंटल) असुन विविध किड रोगास मध्यम प्रतिकारक, लवकर येणारा, मराठवाडा विभागासाठी लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
अमेरिकन कापुस प्रसारित वाण एनएच ६७७ यांचे जिराईत मधील उत्पादन क्षमता हेक्टरी १२ ते १४ क्विंटल प्रति हेक्टर काढणीचा कालावधी १५० ते १६० दिवस आहे, हा वाण जिवाणुजन्य तसेच बुरशीजन्य रोग व रस शोषणा-या किडीस प्रतिकारक आहे. सदरील वाण महाराष्ट्र राज्यातील कोरडवाहु कापुस लागवड असलेल्या भागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.
हरभरा देशी वाण परभणी चना १६ हा अधिक उत्पन्न देणारा, मर रोगास प्रतिकारक, यांञिकीसाठी सुलभ, टपो-या दाण्याचा, मराठवाडा विभागासाठी शिफारसीत करण्यात आला आहे.
तीळ पीकात टिएलटी १० हा अधिक उत्पन्न देणारा टपोरा पांढरा दाणा, महत्वाच्या किड व रोगास मध्यम प्रतिकारक असुन महाराष्ट्रासाठी खरीप व उन्हाळी हंगामास लागवडीसाठी शिफारस करण्यात आला आहे.
ज्वारीचा खरीप हंगामातील परभणी शक्ती हा वाण धान्यामध्ये अधिक लोह (४२ मिली ग्रॅम / किलो) व अधिक जस्त (२५ मिली ग्रॅम / किलो) असणारा व धान्याचे उत्पादन २२ ते २५ Ïक्वटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा व कडब्याचे ५२ ते ५५ क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादकता असणारा वाण महाराष्ट्रासाठी रब्बी हंगामात लागवडीची शिफारस करण्यात आला आहे.
मिरचीचा पीबीएनसी १७ हा वाण हिरवी मिरचीचे अधिक उत्पादन देणारा ५३१ ते ५४६ क्विंटल प्रति हेक्टर, मराठवाडा विभागासाठी खरीप हंगामामध्ये लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. हा वाण लिफकर्ल व अॅंथ्राकनोझ रोगास मध्यम सहनशील आहे.
टोमॅटोचा सरळ वाण पीबीएनटी २० हा वाण रब्बी हंगामामध्ये मराठवाडा विभागास लागवड करण्याची शिफारस करण्यात येत आहे. या वाणाची उत्पादन क्षमता ६१४ ते ६२० क्विंटल प्रति हेक्टर एवढी आहे. या वाणाच्या फळाचा आकार गोल व गडद्द लाल रंग असुन प्रति फळाचे वजन ६० ते ६५ ग्रॅम आहे. लागवडीनंतर ६० ते ६५ दिवसांनी फळाची पहीली काढणीस येते. हा वाण लिफकर्ल व फळामधील अळी, पांढरी माशी व फुल किडे या किडीस मध्यम सहनशील आहे.
हे सात वाण प्रसारण करण्यासाठी संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर व विद्यापीठातील पिक पैदासकारांचे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. इन्द्र मणि यांनी अभिनंदन केले असुन सदर वाण बदलत्या हवामान परिस्थितीत शेतकरी बांधवा करिता अत्यंत उपयुक्त असल्याचे म्हणाले.