सेलू / नारायण पाटील – येथील सेलू नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सेलू यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणारे आदर्श शिक्षक जयंत नाईक यांचा सेवानिवृत्त निमित्ताने सन्मान करण्यात आला तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या तसेच मुद्रांक निरीक्षक पदी निवड झालेल्या बालाजी मगर यांचा सन्मान संस्था उपाध्यक्ष कैलास कदम,एन.एम.देशपांडे, शिवाजी टाके, राजेभाऊ चव्हाण,केशव टाकळकर,रामराव गायकवाड, सचिन विखे यांच्या हस्ते करण्यात आला.
बालाजी मगर हा #महाराष्ट्रातून_ओपन_मधून_२२_वा_तर_ओबीसी_प्रवर्गातून_पहिला आलेला आहे.वडीलांच्या आजारपणामुळे बारावी नंतर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवीधर होत असताना घरी राहून छोटे किराणा दुकान चालवत आईला मदत करत त्याने कुठल्याही क्लासेस शिवाय बहिणीकडे राहून हे यश मिळवलेले आहे.
विद्यार्थांनी निश्चित प्रेरणा घ्यावी असाच थक्क करणारा प्रवास बालाजी मगर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितला.कठीण परिस्थिती असताना परिस्थितीचा बाऊ न करता योग्य नियोजन व निर्णय क्षमता असल्यास प्रत्येक विद्यार्थ्या यशस्वी होऊ शकतो असेही यावेळी त्यांनी सांगितले.
यावेळी बालाजीला मार्गदर्शन करणारे जयंत नाईक,रामराव गायकवाड, मुंजाभाऊ बनसोडे हे शिक्षकही उपस्थित होते.त्यांनीही आपल्या विद्यार्थीचे कौतुक केले.यावेळी ज्ञानेश्वर सोळंके,माधव गव्हाणे,भारत मगर,दिपक उकलकर शरद ठाकर उपस्थित होते.