सेलूत अशोक नायगावकर यांच्या मिश्किली हास्य कवितांचा कार्यक्रम

सेलू ( प्रतिनिधी )
विनोद बोराडे मित्र मंडळाच्या वतीने सोमवार ( दि. १६ ) डिसेंबर रोजी सायंकाळी साडे पाच वाजता शहरातील साई नाट्यगृहात प्रसिद्ध हास्य कवी अशोक नायगावकर ( मुंबई ) यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दैनंदिन जीवनातील प्रसंगांना मिश्कीलपणे टिपून हास्यकल्लोळाची आनंदाभुती देणाऱ्या. जीवनातील ताणतणाव क्षणभरासाठी दूर करणाऱ्या हास्यकवी अशोक नायगावकर यांच्या ‘ मिश्किली ‘ या हास्य कवितांच्या कार्यक्रमास श्रोत्यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संयोजक माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी केले आहे

Comments (0)
Add Comment