सेलू,दि 21 ः
नवनिर्वाचीत राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर व आमदार राजेश विटेकर यांच्या नागरी सत्काराचे आयोजन संदर्भात बैठक शनिवार २१ रोजी स्वामी रामानंद तिर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सभागृहात संपन्न झाली.
या बैठकीमध्ये स्वागताध्यक्षपदी माजी आमदार हरिभाऊ लहाने यांची निवड तर सन्मवयकपदी माजी प्राचार्य डॉ.शरद कूलकर्णी यांची निवड करण्यात आली.यावेळी माजी प्राचार्य विनायक कोठेकर,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे,जयप्रकाश बिहाणी,नंदकिशोर बाहेती,किशोर जोशी रामेश्वर राठी, पंडीत आरकूले,शिवाजी खेडकर,मारोती पंढरकर,रवि मूळावेकर,बाबा काटकर,अविनाश शेरे,डॉ.विलास मोरे,कल्याण पवार,मोहन खापरखूंटीकर,पांडूरंग कावळे,संतोष खाडप आदीसह नागरीकांची उपस्थीती होती.या बैठकीमध्ये विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून मान्यवरांचे सर्व तालूक्यातील नागरीकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार करण्यात येणार आहे.