सेलूत महात्मा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य सुविधा उपलब्ध

सेलू,दि 16 ः
येथील हृदयरोग व मधुमेह तज्ञ डॉ उमेश गायकवाड यांच्या विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हौस्पिटल मध्ये १६ सप्टेंबर पासून शासनाच्या महात्माफुले जण आरोग्य योजना व प्राधानमंत्री जन आरोग्य योजनेची सुविधा सुरू करण्यात आली आहे .
माजी आमदार हरिभाऊ लहाने यांनी परिसरातील गोरगरीब जनतेला आरोग्य विषयक सुविधा मोफत मिळावी .यासाठी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या कडे मागणी करून पाठपुरावा केला होता .व त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून आज पासून पिवळे व केशरी रेशनकार्ड धारक व ५ लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटूंबासाठी गुणवत्तापूर्ण निवडक मोफत उपचारांची सुविधा या दोन मिळणार आहे.
यामध्ये मेडिसिन डिपार्टमेंट ,त्वचा रोग ,हाडांचे आजार ,युरोलॉजी ,गायनीक ,जनरल सर्जरी ,फुफुस रोग ,जंतू संसर्ग विकार ,अतिदक्षता विभाग ,सर्पदंश ,विषबाधा आदी रोगावर या योजनेत मोफत उपचार केले जाणार आहेत .
डॉ उमेश गायकवाड हे प्रसिद्ध हृदयरोग व मधुमेह तज्ञ असून त्यांचे अगदी अद्ययावत असे विघ्नहर्ता रुग्णालय आहे .
यामुळे परिसरातील रुग्णांना याचा मोठा फायदा होणार आहे

Comments (0)
Add Comment