सेलूत सकल मराठा समाजाने दिली रुग्णवाहिका,मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

सेलू ( नारायण पाटील )

येथील आयोजित मनोज पाटील यांच्या सभेसाठी जी लोकवर्गणी जमा झाली होती .त्यामध्ये एकंदर सर्व खर्च होवून जी रक्कम शिल्लक राहिली होती . त्यामधून सेलूत एक रुग्णवाहिका खरेदी करण्यात आली .ब तिचे लोकार्पण आज अंतरवाली येथे मनोज जरांगे पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले .
ही रुग्णवाहिका सर्व समाजातील सर्व जाती धर्मातील लोकांसाठी उपयोगी ठरेल . हा एक नवा संकल्प आज नववर्षाच्या निमित्ताने घेण्यात आला आहे .सेलू येथील मनोज जरांगे पाटील यांच्या सभेसाठी जमलेल्या लोकवर्गणी मधून खर्च वजा जाता शिल्लक राहिलेल्या रकमेचे काय करावयाचे हा प्रश्न सर्वांसमोर होता .
त्यासाठी एक बैठक देखिल आयोजित करण्यात आली होती.
सर्व जाती धर्मातील लोकांनां उपयोगी ठरेल अशी कुठलीही वस्तू घ्यावी हा ठराव या बैठकीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला .व त्यातूनच ही रुग्णवाहिकेची संकल्पना पुढे आली व आज या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा देखील पार पडला .सर्व जाती धर्माच्या रुग्णासाठी ही रुगवाहिका सेलू येथील उपजिल्हारुग्णालयात ठेवण्यात येणार आहे .अशी माहिती देण्यात आली आहे .

मनोज जरांगे पाटलांनी देखील या संकल्पनेबाबत भरभरून कौतुक केले..
नववर्षाच्या या नव्या संकल्पनेबद्दल सेलूकरांचे नाव आणखी मोठे केले याबद्दल सर्व सकल मराठा समाजाचे सर्वत्र मनापासून आभार मानण्यात येत आहेत .

Comments (0)
Add Comment