सेलूत स्व .जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन

सेलू ( नारायण पाटील )
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था ,अंबाजोगाई संचलित स्वामी विवेकानंद शैक्षणिक संकुल ,सेलू यांच्या वतीने आयोजित व देवगिरी नागरी सहकारी बँक म.छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने सेलूत प्रायोजित करण्यात आलेली ” स्व .जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमाला ” दि ३ व ४ फेब्रुवारी रोजी होत आहे .
येथील नूतन विद्यालयातील रा .ब.गिलडा सभागृहात आयोजित या व्याखानमालेतील पहिले पुष्प शनिवार दि ३ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता देवगिरी बँकेचे अध्यक्ष मा .किशोरजी शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली भा. ज. पा. चे राष्ट्रीय अध्यक्ष मा .सुनीलजी देवधर हे गुंफणार असून ” राम मंदिर ते रामराज्य ” हा या व्याख्यानाचा विषय राहणार आहे .
तर दुसरे पुष्प रविवार दि ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ” शिवरायांचा आठवावा प्रताप ” या विषयावर शिवकालीन इतिहासाचे अभ्यासक मा .सौरभ करडे हे गुंफणार आहेत .यावेळी अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे ,कार्यवाह मा .हेमंतजी वैद्य राहणार आहेत .
या व्याख्यानमालेचे हे १२ वे वर्ष असून अनेक नामवंत विचारवंतांनी यामध्ये आपले परखड विचार व्यक्त केलेले आहेत .
तरी या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहकुटुंब उपस्थित राहावे .असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

Comments (0)
Add Comment