सेलू / प्रतिनिधी – शहरातील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात थोर समाजसुधारक, स्वछतेचे महत्व पटवून देणारे संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी ( २०डिसेंबर )साजरी करण्यात आली. प्रारंभी गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मुख्याध्यापक शंकर शितोळे ,प्रमुख वक्ता इयत्ता ७ वीची विद्यार्थिनी कु.कल्याणी काष्टे उपस्थित होते.
कु.कल्याणी हिने संत गाडगेबाबा यांच्या जीवन कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना करून दिला.ती पुढे म्हणाली की ,गाडगेबाबा यांनी कीर्तनाच्या माध्यमातून शिक्षणाचा संदेश दिला,गावोगावी जाऊन स्वछतेचे महत्व पटवून दिले, अंधश्रद्धेला विरोध केला.लोकांना दोषांची व दुर्गुणांची जाणीव करून दिली.
अध्यक्षीय समारोप करताना शंकर शितोळे यांनी आपले घर जसे आपण स्वच्छ ठेवतो त्याप्रमाणे शालेय परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण संकल्प करावा अशी अपेक्षा व्यक्त केली.
शालेय विद्यार्थ्यांनी शालेय परिसर स्वच्छ केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिव्या कटारे व मयुरी कानडे यांनी केले.आभार दिव्या कटारे हिने मानले.