महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन (लालबावटा )च्या वतीने सेलूत निदर्शने

सेलू / नारायण पाटील – येथील हुतात्मा स्मारक मध्ये गायरान धारकांना मालकी हक्क द्या, मागेल त्याला घरकुल द्या,निराधार, परितक्त्या, विधवा, वृद्ध, यांचे अर्ज स्वीकारा व तात्काळ निवडणुकी पूर्वी निकाली काढा, मागेल त्याला रोहयो चे काम द्या. इत्यादी मागण्या साठी परभणी, जालना, बीड जिल्हा चा मेळावा झाला. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्या साठी AIAWU चे कॉम्रेड विक्रम शिंह, कॉ. मारोती खंदारे (राज्य अध्यक्ष )कॉ. रामकृष्ण शेरे पाटील, कॉ. अशोक बुरखुडे, लिंबाजी धनले,नंदकुमार प्रधान इत्यादी नी मार्ग दर्शन केले. अध्यक्ष समारोप अशोक (दादा )यांनी केला. लालबावट्या च्या घोषणा देऊन 4मार्च 2024ला आयुक्त कार्यालय संभाजीनगर येथे बेमुदत धरणे आंदोनाची तारीख देखील यावेळी जाहीर करण्यात आली.

Comments (0)
Add Comment