सेलू ( प्रतिनिधी )
साने गुरुजी यांच्या १२५ व्या जयंती चे औचित्य साधून येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था संचलित श्रीरामजी भांगडीया स्मारक व्याख्यानमाला व शिक्षण विभाग पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दि १८ डिसेंबर रोजी सायंकाळी सडे पाच वाजता प्रसिद्ध शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .
येथील साई नाट्यगृहात आयोजित या व्याख्यानाचा विषय “शिक्षकांसाठी साने गुरुजी ” हा राहणार आहे .
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ सत्यनारायण लोया हे उपस्थित राहणार आहेत .तरी शहरातील शिक्षक शिक्षिका व शिक्षण प्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे .असे आवाहन नूतन शिक्षण संस्था ,गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत व संयोजक डॉ शरद कुलकर्णी यांनी केले आहे .