सेलूचा संगमेश मलवडे बनला लष्करात लेफ्टनंट.

सेलू ( नारायण पाटील)
श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल चा विद्यार्थी लेफ्टनंट संगमेश कैलास मलवडे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे यांनी सेलू रेल्वे स्थानक येथे सत्कार केला.

सेलू येथील कैलास मलवडे शिक्षक यांचा यांचा मुलगा संगमेश मलवडे याने एनडीएचे तीन वर्षांचे खडतर प्रशिक्षण नुकतेच पूर्ण केले असून, तो सैन्य दलात लेफ्टनंट अधिकारी झाला आहे. त्याच्या या कामगिरीने एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल सेलू व तालुक्याची मान देशात उंचावली आहे. सैन्य दलात दाखल होऊन देशसेवा करणे ही तालुक्याची परंपरा आहे. आजपर्यंत हजारो युवक सैन्य दलात सीमेवर देशाचे रक्षण करत आहेत. हीच परंपरा संगमेश याने कमी वयात सैन्य दलात लेफ्टनंटपदी अधिकारी होऊन कायम ठेवली आहे.
संगमेश याचे प्राथमिक शिक्षण श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल के आर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूल येथे झाले आहे. देशसेवेची प्रेरणा प्राथमिक शिक्षणातून च मिळाली यासाठी आम्हा विद्यार्थ्यांना योग्य ते संस्कार देण्याचे सत्कार्य संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे व शाळेतील मार्गदर्शक शिक्षक शाळेतच करत असतात असे मत सत्कार प्रसंगी लेफ्टनंट संगमेश मलवडे याने व्यक्त केले.

लहानपणापासूनच सैन्यात अधिकारी होऊन देशसेवा करण्याचे ध्येय उराशी बाळगले होते.असे मत संगमेश च्या वडिलांनी व्यक्त केले.आपला मुलगा सैन्य दलात मोठ्या पदावर अधिकारी व्हावा अशी त्यांची इच्छा होती, ती इच्छा संगमेश ने खडतर कष्ट घेत पूर्ण केलीय.

भारतीय सैनिकांनी जनतेच्या सुरक्षिततेचा वसा घेतला आहे. अत्यंत जागरूकपणे जवान सीमेचे रक्षण करतात. ही एक उच्च कोटीची देशसेवा आहे. देशसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणाऱ्या या देशभक्तासाठी कृतज्ञतापूर्वक आम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना सतत शाळेत उपक्रम घेतले जातात.आम्ही सीमेवरील सैनिकांना भेटकार्ड, मिठाई,विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या रक्षाबंधनाच्या दिवशी दरवर्षी पाठवत असतो. विद्यार्थ्यांमध्ये देश सेवेची भावना जागृत करण्याचे संस्कार ही आजची गरज आहे असे प्रतिपादन डॉ संजय रोडगे यांनी केले.

सत्कार कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ संजय रोडगे,सचिव डॉ सविता रोडगे प्रशासकीय अधिकारी प्रा महादेव साबळे, शाळेचे प्रिन्सिपल कार्तिक रत्नाला, घटक संस्थेतील सर्व मुख्याध्यापक व शिक्षक यांनी अभिनंदन केले व पुढील देश सेवेच्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.

Comments (0)
Add Comment