गंगाखेड – येथील कै सौ शेषाबाई मुंडे महाविद्यालयात श्री संत सेवालाल महाराज यांची 286 वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या जीवन कार्य व विचारांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
संत सेवालाल महाराजांनी समाजाला उपदेश देताना सांगितले आहे की प्रत्येकाने समाजसेवा करताना ज्या पद्धतीने स्वतःच्या कुटुंबाची सेवा करतो त्याच पद्धतीने समाजाची सेवा करावी, कोणालाही कोणत्याही कारणावरून दुय्यम स्थान देऊ नये तसेच निसर्गाची पूजा करावी व त्यापूस दूर जाऊ नये असे मोलाचे मार्गदशन केले आहे. आजच्या समाजात निसर्गाचा, नीतिमत्तेचा व माणुसकीचा जो ऱ्हास होत आहे तो टाळण्यासाठी आणि एक निती-मूल्य आधारित, कर्तव्यपारायण, निसर्ग तसेच माणुसकी जोपसणारा समाज निर्माण होण्यासाठी संत सेवालाल महाराजांचे विचार आजच्या पिढीने आत्मसात करून समाज जीवनात प्रत्यक्षात उतारावेत असे मत अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक प्रा डॉ राजीव आहेरकर यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ बालाजी ढाकणे यांनी संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच प्रा डॉ अशोक केंद्रे, प्रा डॉ बबन गित्ते, प्रा डॉ अरुण मुंडे, प्रा डॉ सुभाष यादव, प्रा विठ्ठक टेकाळे, प्रा डॉ साहेब सातपुते, प्रा नामदेव लटपटे, प्रा डॉ रेखा बने, प्रा डॉ लहू फड, प्रा डॉ किरण पिणाटे, प्रा सिद्धार्थ शिंदे, प्रा डॉ अविनाश खोकले, श्री बालासाहेब मुंढे, श्री गोविंद गित्ते, श्री रघुनाथ चव्हाण, श्री ज्ञानोबा मुंढे हे उपस्थित होते.