सावरकरांच्या धगधगत्या व ज्वलंत विचारानं तरुण पिढीला स्वातंत्र्य लढ्यात ओढले-महेश खारकर

सेलू / नारायण पाटील – धर्मासाठी मरावे,मरोनीअवघ्यांसी मारावे! मारिता मारिता घ्यावे राज्य आपुलें !! या विचाराने सावरकरांचा हा उद्देश ४० वर्षात सफल झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात भारतीय सैन्यात स्वातंत्र्याची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. त्यांच्यात चेतना उत्पन्न झाली आणि सैन्य इंग्रजावर उलटले ही गोष्ट इंग्रज सत्ताधारी समजले . म्हणून भारत स्वतंत्र झाला . आपले ध्येय पुष्कळ अंशी साध्य झाले की तीन चतुर्थांश भारत स्वतंत्र झाला उर्वरित खंडित भारतातूनही इंग्रजी इंग्रजी सत्ता गेली याचा आनंद आहे.परंतु पण हिंदू विरोधी सत्ता निर्माण झाली याचे दुःख याचा राग ही भावना व्यक्त करण्यासाठी सावरकरांनी सन १९५२ मध्ये अभिनव भारत या आपल्या सशस्त्र क्रांतीकारक संस्थेचा सांगता समारंभ ध्येयपूर्ती समारंभ भव्य प्रमाणात पुणे येथे साजरा केला . त्यावेळच्या भाषणा सावरकर म्हणाले की ब्रिटिश देश जरी वाचला तरी त्या दोन महायुद्धाच्या माऱ्याखाली ब्रिटनच्या साम्राज्यशक्तीचा आणि उन्मतपणाचा चक्काचूर झाला.

 

स्वातंत्र्यलढ्यात तरुणांचा सहभाग वाढविण्यासाठी प्रखर हिंदुत्वाची हिंदुस्थानची गरज आहे असं त्यांना वाटलं म्हणून हिंदू हिंदुत्वाचा प्रचार प्रसार यावर बोलायचे . ब्रिटनची महायुद्धाची शेवटी अशी स्थिती झाली होती की हिंदुस्तानी भूदल नौदल आकाशदल या तिन्ही विभागातील झाडून साऱ्या हिंदी सैन्याने ब्रिटिश विद्रोहाचा उठाव केला होता किंवा ते सैन्य तसा उठाव कमी करण्याच्या मनस्थितीत होते १८५७ मध्ये हिंदी सैन्य ब्रिटिश सत्तेवर जेव्हा उलटले तेव्हा ब्रिटन सहस्त्राविधी जातिवंत ब्रिटिशांचे नवे सैन्य धाडू शकले पण आता विद्रोही बनलेल्या देशावर, स्वतःची साम्राज्यसत्ता शस्त्रशक्तीने चालविण्यासाठी जुने वा नवे असे कोणतेही कोणाचेही जातीवंत ब्रिटिश सैन्य इकडे धाडणे अशक्य झाले . अशी विचारधारा असलेल्या सावरकरांनी तरुण तरुणांना स्वातंत्र्याविषयी व ब्रिटिशाविषयी तेढ निर्माण करून स्वातंत्र्याची लालसा निर्माण केली. असं प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त महेश खारकर बोलत होते.

 

 

प्रमुख अतिथी म्हणून बोलताना गंगाधर गूंजकर म्हणाले सावरकरांनी आपल्या साहित्यातून तरुण वर्गाला भारतीय असल्याचा अभिमान व्हावा असं सावरकरांनी लिहिलेल्या पुस्तकात वाचायला मिळते.काळेपाणी या कादंबरीतुन सावरकरांनी भोगलेल्या यातना आणि स्वातंत्र्यासाठी त्याग आणि आपल्यातील कार्यकुशलता सिध्द करण्यासठी किती पराकाष्ठा कराव्या लागतात हे त्यांनी दाखवून दिले.स्वातंत्र्ययुध्दात समर्पण भाव…त्याग….संयम…चाणाक्ष दृष्ट्रि ठेवून वाटचाल करावी लागते.आजच्या तरुणांनी सावरकरांनी लिहिलेले साहित्य जाज्वल्य देशाभिमान वाढविण्यासाठी उत्तम साहित्य आहे हे तरुणांनी वाचालं पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय विटेकर सुत्रसंचलन ग्रंथपाल महादेव आगजाळ, आभार पंडित जगाडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिरुद्ध टाके ,पवन फरकांडे, गोविंद सोळंके . कार्यक्रमासाठी प्रा.अनंत मोगल, रामचंद्र गजमल इत्यादी उपस्थित होते .

Comments (0)
Add Comment