शाळा ही मानवी जीवनाचा पाया असते – लक्ष्मिकांत देशमुख

सोनपेठ / प्रतिनिधी
मानवी आयुष्याच्या जडणघडणीत शाळेतुनच नैतिकमुल्यांचे संस्कार बालमनावर होतात आणि म्हणूनच शाळा ही मानवी जीवनाचा पाया असते असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी केले.
शेळगाव येथील कै.बाजीराव देशमुख विद्यालयाच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जे जे नवं म्हणून आहे ते ते विद्यार्थ्यांनी मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत आणि सतत नवनविन शोध लावत देशाच्या उभारणीत आपलं जे जे म्हणून योगदान ते दिलं पाहिजे यासाठी अभ्यास आणि आपल्या शिक्षकांचे मार्गदर्शन घेतले पाहिजे असेही देशमुख यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुलवामा येथील शहिद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी सैनिकी पथसंचलन करत मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले होते.
यावेळी शाळेतील तब्बल १६ विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कवी गणेश पाटील, मुख्याध्यापक दिनकर देशपांडे, प्रकाश राठोड व राजकुमार धबडे यांनी मनोगतं व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मिकांत देशमुख तर‌ प्रमुख उपस्थितीत कवी गणेश पाटील, यशोधरा आश्रम शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश राठोड, सावित्रीबाई फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर देशपांडे, पंचायत समितीचे माजी सभापती विलास कोकाटे,माजी सरपंच बाळासाहेब तळेकर,सखारामजी मुलगीर, कमलाकर काळे, रफिकभाई,सत्तार भाई पठाण यांच्यासह आदिंची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन भक्तराज गांगर्डे यांनी तर आभार ओंकार जाडे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील ओंकार जाडे ,शिवाजी पाटील,सत्यशील खंदारे,ओमप्रकाश लष्करे,
महेश जाधव,धम्मानंद खंदारे,संतोष मेहत्रे,भक्तराज गांगर्डे या शिक्षकांसह शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला होता.
कार्यक्रमासाठी शाळेतील विद्यार्थ्यांसह पालकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती.

Comments (0)
Add Comment