ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशनच्या परभणी जिल्हा संचालकपदी राहुल बजाज यांची निवड

 

परभणी, प्रतिनिधी – AIREA (ऑल इंडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन) ची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. गांधीनगर गुजरात येथे आयोजित कार्यक्रमात परभणी येथील राहुल द्वारकादास बजाज यांची AIREA च्या परभणी जिल्हा संचालकपदी निवड झाली.

 

श्री राहुल बजाज यांनी सांगितले की, ऑल इडिया रिन्यूएबल एनर्जी असोसिएशन ( AIREA ) ही राष्ट्रीय पातळीवरील संस्था असून, मंत्रालयाकडून राबविण्यात येणाऱ्या अक्षय्य ऊर्जा प्रणालींचा जलद अवलंब आणि अपारंपरिक उर्जा क्षेत्रातील ऑनलाईन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी काम करत आहे. संस्था नियमितपणे राज्य आणि केंद्रीय मंत्रालयांशी संवाद साधते आणि विविध RE योजनांच्या अंमलबजावणीसाठी उपयुक्त योगदान करत आहे.

 

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांनी जुलै महिन्यात सुरू केलेल्या सौर रूफ टॉप सबसिडीसाठी राष्ट्रीय पोर्टल सुरू करण्यात AIREA ची महत्त्वपूर्ण भूमिका होती. AIREA ही GCRT फेज 2 निवासी छतावरील सौरसंयंत्र अनुदान कार्यक्रमाच्या जलद अंमलबजावणीसाठी महावितरण संयुक्त समितीचे सदस्य आहे, अशी माहिती श्री राहुल बजाज यांनी दिली.

 

 

AIREA चे जिल्हा संचालक महावितरण अधिकाऱ्यांशी रूफटॉप सोलर प्रक्रियेतील अडथळे आणि विलंब दूर करण्यासाठी संवाद साधतील. जास्तीत जास्त नागरिकांनी सौर अनुदानाचा फायदा घ्यावा. लवकरच ग्राहकांकरिता तालुकास्तरीय मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात येणार आहे, असे श्री राहुल बजाज यांनी सांगितले. ‌

 

 

याप्रसंगी भारताचे सोलर मॅन डॉ. चेतन सिंग सोलंकी सोलार माय पॅशन या प्रसिद्ध यूट्युब चॅनेलचे श्री. अजित बहादूर ,साकेत सुरी, पंकज खिरवडकर, अवतार पटेल, अमित आरोकर, अमित देवतळे उपस्थित होते. आशिष माळी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पहल सोलारतर्फे या कार्यक्रमाचे आयॊजन करण्यात आले होते.

Comments (1)
Add Comment
  • 20bet

    Your article gave me a lot of inspiration, I hope you can explain your point of view in more detail, because I have some doubts, thank you.