चारठाणा :- प्रतिनिधी
रोजगार साह्ययक संघटनेच्या जिंतूर तालूका अध्यक्षपदी रंगनाथ गडदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी लक्ष्मण राठोड, मधुकर घनसावत, सचिव म्हणून माधव घुगे यांची निवड झाली आहे.सर्कल प्रमुख म्हणून बाळासाहेब पालवे, भिमराव खंदारे. छत्रभूज ससे, कैलास राठोड, नरहरी इघारे, अजिम शेख, बळीराम जाधव, मुरलीधर चव्हाण,शेख अनिस अदी जनावर जिम्मेदारी दिली आहे.
रोजगार हमी योजना सक्षमपणे राबवण्यासाठी रोजगार सेवकांचे मोलाचे योगदान आहे ,यासाठी गडदे हे नेहमीच कटिबद्ध असतात, तसेच ते सामाजिक कार्यायात नेहमीच अग्रेसर असून त्याबरोबर रोजगार साह्ययक अडी अडचणी समस्या मानधानाचा प्रश्न ,रोजगार साह्ययक शासन पातळीवर विविध सोयीसुविधा मिळाव्यात ,यासाठी पाठपुरावा करून अनेक वेळा आवाज उठवितात.
या निवडीसाठी गणेश मते, भगवान नागरे, परमेश्वर जाधव, काशिनाथ मुंडे, रमेश पवार, खिल्लारे लाटे,दराडे जमगुंडे, तालुक्यातील सर्व ग्रामरोजगार साह्यक उपस्थित होते.
ग्राम रोजगार साह्ययक यांचे विविध प्रश्न असून रोजगार सेवकांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेणे,
रोजगार सेवकांचे मानधन त्याच्या खात्यावर जमा करणे, शासकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधा ग्राम रोजगार सेवकांना द्या ,रोजगार सेवकांना पीएफ ,इन्शुरन्स ,विमा, अल्पो आहार , प्रवास भत्ता द्या ,अशा विविध मागण्या वर्षानुवर्ष खितपत पडल्या असून ह्या मागण्या सोडवण्यासाठी शासन पातळीवर आक्रमकपणे प्रयत्न करीन असे रंगनाथ गडदे यांनी बोलताना सांगितले.