श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सात माजी विद्यार्थ्यांची शासकीय सेवेत निवड

परभणी,दि 19 ः
अभियांत्रिकी शिक्षणासाठी अग्रमानांकित असणाऱ्या मराठवाड्यातील नामवंत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणी येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागातील सात माजी विद्यार्थ्यांची जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता पदी नियुक्ती झाली असून सर्व सातही विद्यार्थी लवकरच शासकीय सेवेत रुजू होणार आहेत.

यामध्ये शितल लगड जलसंपदा विभाग छत्रपती संभाजीनगर, ज्ञानेश्वर मगर जिल्हा परिषद बांधकाम विभाग नागपूर, नितीन फुलपगार जिल्हा परिषद बांधकाम विभाग उस्मानाबाद, पूजा राठोड सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदिया, करण वाघमारे जलसंपदा विभाग नांदेड, बालाजी पवार उपनिरीक्षक मेघालय आर्मी (केंद्रशासन) या ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करून गौरव करण्यात आला. यापूर्वी देखील श्री शिवाजी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध विभागात सेवेची संधी मिळाली आहे व ते उच्च पदावर कार्यरत असून राष्ट्र निर्माण कार्यात सहभागी आहेत.

या उज्वल कामगिरीबद्दल सर्व नवनियुक्त माजी विद्यार्थ्यांचे मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री प्रकाशदादा सोळंके, सरचिटणीस श्री सतीशभाऊ चव्हाण, सहसचिव श्री अनिलभाऊ नखाते तसेच महाविद्यालय विकास समितीचे सदस्य श्री संग्राम भैय्या जामकर, श्री स्वराजसिंह परिहार, श्री रणजीत काकडे, महाविद्यालयाचे संचालक डॉ. आनंद पाथ्रीकर, स्थापत्य अभियांत्रिकी विभागप्रमुख प्रा.शेख अक्रम, प्रा सतीश पाईकराव, प्रा अजय वाढवे, प्रा विनोद पवार, प्रा भगवान शिंदे, ग्रंथपाल श्री संदीप चव्हाण, कार्यालय अधीक्षक श्री विकास सोळंके व सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी निवड झालेल्या माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Comments (0)
Add Comment