श्री शिवाजी महाविद्यालयातील एनसीसीच्या सहा विद्यार्थ्यांची अग्निवीरसाठी निवड

 

परभणी, प्रतिनिधी – नुकत्याच संभाजीनगर येथे झालेल्या सैन्यभरतीत अग्नीवीर म्हणून येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सहा विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

निवड झालेले सहाही विद्यार्थी एनसीसीच्या (राष्ट्रीय छात्रसेना) कॅडेट्स आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार शनिवार (दि.१७) रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे तसेच विभागप्रमुख लेफ्टनंट डॉ.प्रशांत सराफ यांची उपस्थिती होती.

अग्निवीरसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये खाडे धम्मधर,घाटगे दिपक,बोकारे आदिनाथ,गलांडे राहुल,भालेराव गंगाधर आणि तडवी पठाण अमर यांचा समावेश आहे. चालू शैक्षणिक वर्षांपासून मुलींसाठी एनसीसीचे युनिट सुरू झाले आहे.

 

 

प्रवेशित विद्यार्थिनींना उपस्थितांच्या हस्ते युनिफॉर्म वाटप करण्यात आले. सत्कार प्रसंगी प्राचार्य डॉ.जाधव यांनी भरती झालेल्या कॅडेटसचे कौतुक केले व पुढील भविष्यासाठी शुभेच्छा देताना म्हणाले, महाविद्यालयाच्या छात्रसेनेचे कॅडेट्स दरवर्षी सातत्याने भरती होत आहेत. देशसेवेसाठी त्यांचे योगदान अमूल्य आहे असे गौरवोद्गार काढले.

 

यावेळी ५२ महाराष्ट्र बटालियन राष्ट्रीय छात्रसेना नांदेडचे कमाडिंग ऑफिसर कर्नल रंगाराव यांनी दूरध्वनी द्वारे भरती झालेल्या कॅडेटसना विशेष शुभेच्छा देऊन कौतुक केले.

 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंडर ऑफिसर अभिषेक भोसले, धनराज गुट्टे, सार्जंट चक्रधर जावळे आदींनी परिश्रम घेतले. याप्रसंगी छात्रसेनेचे कॅडेट्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments (0)
Add Comment