सेलू / नारायण पाटील – महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन संलग्नित योगासन स्पोर्ट्स असोसिएशन परभणी यांच्यावतीने जिल्हास्तरीय योगासन स्पर्धा २७ जुलै रोजी आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत सेलू येथील बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या स्वराज शंभूराजे काकडे या विद्यार्थ्यांने उत्कृष्ट योगासन सादर करीत ज्युनिअर गटात द्वितीय क्रमांक मिळविला. दि १६ ते १८ ऑगस्ट दरम्यान संगमनेर येथे आयोजित राज्यस्तरीय योगासन स्पर्धेसाठी स्वराज याची निवड झाली आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम. लोया, उपाध्यक्ष डी. के. देशपांडे, चिटणीस प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाश बिहाणी तसेच नंदकिशोर बाहेती, सीताराम मंत्री, मकरंद दिग्रसकर, दत्तराव पावडे, प्राचार्य एन.पी.पाटील, भुजंग देऊळ गावकर आदींनी अभिनंदन केले आहे.