सेलू / नारायण पाटील – सेलू तालुका क्रिकेट संघटना, व नितिन व्यायाम शाळा कला क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू
नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा -२०२४ नूतन महाविद्यालय क्रिडांगण, सेलू येथे दि. 21 जानेवारी 2024 रविवार वार रोजी सकाळ सञात जवाहर परभणी वि. इम्रान लातूर दरम्यान नाणेफेक लातूर जिंकून प्रथम फलंदाजी जवाहर परभणी संघांस आमंञित केले 20 षटकात सर्व बाद 189 धावा केल्या यात इल्जाह 61 धावा करत चौफेर फटकेबाजी केली रितिक जाधवने 53 धावांत 6 षटकार मारले, अजिंक्य मस्के 18, अखिल शेख 20 धावांचे योगदान दिले. इम्रान लातूर च्या आक्रमक मारा ऋषिकेश फुले यांनी 6 गडी तंबूत पाठवले, तर सचिन तिवारे 2 गडी बाद केले.
इम्रान लातूर संघाने 189 धावाचा पाठलाग करताना 20 षटकात 191/6 गडी बाद झाले यात निशांत पवार यांनी चौफेर फटकेबाजी करताना 111 धावा 5 षटकार 11 चौकार मदतीने केल्या. आशिष सुर्यवंशी 53 धावांचे योगदान दिले. परभणी संघाच्या वतीने गोलंदाजी करताना अखिल शेख 3 गडी, समीर पटेल 2 गडी बाद केले.
सामनावीर पुरस्कार लातूरच्या निशांत पवार यास विलास आकात, रघुनाथ बागल, मंडळाचे अध्यक्ष हरीभाऊ लहाने उपस्थित होते.
: दुपारच्या सत्रात नितीन क्रिकेट क्लब सेलू वि. सी.सी. मालेगाव दरम्यान नितीन सेलू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात सर्व बाद 110 करताना गजानन शेलार 18, मंगेश 16, राजेश राठोड 15, सलमान सिद्दीकी 36,कपिल ठाकुर ,14 धावांचे योगदान दिले.
मालेगाव संघाच्या भेदक मारा मुजिम्मल खान , नकुल सोनवणे, शुमिल प्रत्येकी 2-2 गडी बाद केले.
मालेगाव संघाने 110 पाठलाग करताना 16 षटकात 112/4 गडी बाद झाले. 6 गडी राखून उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला.
यात जानी शेख 31, शोमिल 14,दिवा करत 6 गडी राखून विजय प्राप्त केला.
नितीन सेलू संघाने गोलंदाजी करताना एजाज कादरी 2 गडी, शंकर गायकवाड, प्रमोद गायकवाड यांनी प्रत्येकी 1-1 गडी बाद केले
सामनावीर पुरस्कार मालेगाव च्या इम्रान गेल यास प्रभाकर सुरवसे, राजेश लोया, पञकार इलियास , लक्ष्मण सोळंके आदी उपस्थित होते.
नितीन मंडळाचे अध्यक्ष मा.आ.हरीभाऊ लहाने यांच्या हस्ते देण्यात आला.
पंच प्रसाद कुलकर्णी, डॉ . मिनानाथ गोमचाळे तर समालोचक, शेख यासेर, विजय वाघ,पवन फुलमाळी,मोईन शेख, वैभव सरकटे, यांनी केले.
अविनाश शेरे, खाजा भाई, बजरंग घरकुले, विनायक खंडागळे, काळे, बाबा काटकर, संतोष रोडगे, मोहन बोराडे, नसीब भाई, अल्लादिन अन्सारी परिश्रम घेत आहेत.