सेलूत दर्पण दिन उत्साहात साजरा

पत्रकारांच्या वतीने लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास अभिवादन

 

सेलू / नारायण पाटील – बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी पहिले मराठी “दर्पण”हे वृत्तपत्र काढले .व मराठी पत्रकारितेचा इतिहास घडला .त्यांच्या पावन स्मृतीस वंदन व त्यांच्या योगदानाचा आदर म्हणून दरवर्षी ६ जानेवारी हा दिवस “दर्पण दिन ” म्हणून साजरा केला जातो .सर्व पत्रकार बांधव यादिवशी त्यांच्या व लोकमान्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतात .
दि ६ जानेवारी २०२५ सोमवार रोजी सेलूत देखील सर्व पत्रकार बांधवाच्या वतीने मोठ्या उत्साहात दर्पण दिन साजरा करण्यात आला .येथील ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर समोरील लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास यावेळी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .

 

यावेळी माजी आमदार हरिभाऊ लहाने ,माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे ,पोलीस निरीक्षक दीपक बोरसे , साइराज बोराडे ,बाबा काटकर ,अविनाश शेरे ,बंडू देवधर,विजय चौधरी आदींची प्रमुख उपस्थिती होती .

 

अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल ,व्हॉईस ऑफ मीडिया चे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी ,डिजिटल मीडियाचे अध्यक्ष सतीश आकात ,जेष्ठ पत्रकार डी व्ही मुळे ,कांचन कोरडे ,नारायण पाटील ,राम सोनवणे ,अशोक अंभोरे ,संतोष कुलकर्णी यांच्या सह मोहसीन मामु ,महंमद इलियास, निसार अहेमद ,बाबासाहेब हेलसकर ,शिवाजी आकात ,रेवन अप्पा साळेगावकर ,अबरार बेग ,प्रसाद खारकर ,सचिन हिवरे ,पंकज सोनी ,शिवप्रसाद काबरा ,शंभू काकडे ,पूनम खोना ,संजय मुंढे ,राहुल खपले ,संतोष गरड,रोडगे श्रीपाद , संदीप वरकड ,महेश राऊत ,दीपक जडे ,अझहर बेग , आदींची उपस्थिती होती .

Comments (0)
Add Comment