सेलूत दत्तजन्मोत्सव सोहळा व गुरुचरित्र पारायण संपन्न

 

सेलू / प्रतिनिधी – येथील श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित सेवा केंद्र महेश नगर सेलू येथे दि 9 डिसेंबर ते 16 डिसेंबर 2024 या कालावधीत अत्यंत उत्साहात दत्तजन्मोत्सव सोहळा व गुरुचरित्र पारायण नामजप यज्ञ सोहळा संपन्न झाला .

 

या नामजप यज्ञ सोहळ्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी दिनांक 8 डिसेंबर रोजी सेलू शहरातील गणपती गल्ली, शेरे गल्ली, फुलारी गल्ली ,मारवाडी गल्ली, सारंगी गल्ली ,गोविंद बाबा मठ, जवाहर रोड, क्रांती चौक, घडी टावर मार्गे महेश नगर केंद्र येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यात महिला , पुरुष व बाल सेवेकरी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

 

गुरुचरित्र परायाना साठी महिला व पुरुष सेवेकरी 128 तर प्रहर सेवे साठी अनेक महिला व पुरुषांनी नाव नोंदणी केली तसेच गणेश याग 210 मनोबोध याग 134 गीताई 140 स्वामी याग 241 चंडीयाग 300 रूद्रयाग 338 मल्हारीयाग 300 तसेच सप्ताह काळात स्वामी चरित्र ,दुर्गा सप्तशती ,मल्हारी सप्तशती पाठ आदींची सेवा संपन्न झाली नामजपमध्ये स्वामी समर्थ जप, गायत्री मंत्र जप, नवार्णव मंत्र, महामृत्युंजय मंत्र आदींच्या सेवा संपन्न झाल्या गुरुचरित्र पारायनाची सांगता दिनांक 15 डिसेंबर रोजी व दत्त जन्म सोहळा दुपारी 12वाजून 39 मिनिटाला संपन्न झाला तसेच दिनांक 16 डिसेंबर रोजी गुरुचरित्र पारायण करणारे सेवेकरी यांनी आपल्या स्वतःच्या घरून शिऱ्याचा प्रसाद बनवून एकत्रित करून मांदियाळी स्वरूपात तो प्रसाद महाराजांना नैवेद्य म्हणून दाखवण्यात आला त्यानंतर केंद्रातील सर्व सेवेकऱ्याच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आला.या सप्ताह काळात ज्या सेवेकऱ्यानी स्वामी सेवेतून वेगवेगळे अनुभव आलेत, अशा सेवेकऱ्याणी अनुभव कथन करून दिनांक 17 डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता करण्यात आली.

guru charitra parayan in seluselu newsselu social news
Comments (0)
Add Comment