सेलू / प्रतिनिधी – ७० लाख २०हजार २७४ रुपये ( २०२४/२५) या वर्षाचे येणे बाकी असल्याने सेलू नगरपालिकेच्या कर निरीक्षक पाथकाने गुरुवार दि २७ फेब्रुवारी रोजी सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीला टाळे ठोकून कारवाई केली आहे.
मार्केट कमिटी सील करून त्यावर लावले पोस्टर
नगर परिषद, सेलू यांची कृ.उ.बा.स. कडे विविध मालमत्ता संबंधी साल सन २०२४/२५पर्यंतची रक्कम रूपये ७०,२०,२७४ येणे बाकी आहे. सदर रक्कम भरणेकरिता तुम्हाला वेळोवेळी मागणी बिल / स्मरणपत्र दिलेली आहेत. तसेच सदरील जागेचा कर भरना न केल्यामुळे नाईलाजास्तव 3 तासाच्या कालावधीत कर वसुली करिता अटकावणी बाबत पुर्वसुचना देण्यात येत आहे. या कालावधीत दिलेल्या अंतिम मुदतीत आपले आवश्यक अभिलेख काढुन घ्यावेत जेणे करून अत्यावश्यक कामावर परितम होणार नाही. याची खबरदारी घ्यावी.
करिता थकित कराचा भरणा न केल्यामुळे महाराष्ट्र नगर परिषदा नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२,१५६ मधील तरतुदी नुसार स्थावर व जंगम मालमत्तेची अटकावणी/ जप्ती करून आणि ती विकुन वसुल करण्यात येणार असल्याचे पत्रात नमूद केले आहे.