सेलू / नारायण पाटील – पेन्शनर्स असोसिएशनच्या वतीने स्व. वसंतराव जोशी यांच्या स्मरणार्थ पार पडलेल्या वसंत संगीत रजनी कार्यक्रमातील श्रीरामगीतोत्सवाने सेलूकर मंत्रमुग्ध होऊन गेले.
सांस्कृतिक दृष्ट्या संपन्न असलेल्या सेलू शहरात गीत-संगीताचा वारसा पुढे चालू ठेवण्याच्या दृष्टीने पेन्शनर्स असोसिएशनच्या विसावा सभागृहात प्रती वर्षाप्रमाणे वसंत संगीत रजनी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संगीताचार्य गंगाधर कान्हेकर व डॉ. राजेंद्र मुळावेकर यांच्या संयोजनाखाली श्रीरामगीतोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
सहभागी कलावंतांनी श्रीरामाची भजने व गीतांचे अप्रतिम सादरीकरण केले. गीतोत्सवात यशवंत चारठाणकर, सच्चिदानंद डाखोरे, डाॅ राजेंद्र मुळावेकर, पुजा तोडकर, अलका धर्माधिकारी, रमा बाहेती, अनघा पांडे, डॉ. विलास मोरे, सत्यनारायण ताठे, गौतम सूर्यवंशी, शंतनू पाठक, कल्याणी पाठक, सुरेखा चारठाणकर, सुषमा दामा, सीमा सुक्ते, प्रिती राठी या कलावंताचा सहभाग होता.
संगीतसाथ तबला गंगाधर कान्हेकर, शिवाजी पाठक, हार्मोनियम सचितानंद डाखोरे, शंतनू पाठक, प्रकाश सुरवसे यांनी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नागेश देशपांडे, प्रा. डॉ. गंगाधर गळगे, नारायण इक्कर, रविंद्र मुळावेकर, प्रकाश धामणगावकर यांनी परिश्रम घेतले.