सेलू / नारायण पाटील – १० मे रोजी होणाऱ्या भगवान परशुराम जन्मोत्सव निमित्त परशुराम संघटनेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत तसेच ब्राम्हण एकता दीना निमित्त सेलूत आज शिर्डीचे संत साईबाबांचे सद्गुरू व शहराचे ग्रामदैवत केशवराज बाबासाहेब महाराज मंदिर मध्ये समस्त समाज बांधव व भगिनींची एक बैठक आयोजित करण्यात आली .
यावेळी के बा विद्यालयातील शिक्षिका जयश्री सोंनेकर यांच्या हस्ते परशुरामाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले .यावेळी जयश्री ताई यांनी प्रास्ताविकात परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती देऊन सर्व समाजबांधवांनी हा जन्मोत्सव तन ,मन धनाने सहकार्य करून अत्यंत उत्साहात व जल्लोषात साजरा करावा व मोठ्या संख्येने यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत सहभागी व्हावे .तसेच भविष्यात समाजातील विविध सामाजिक प्रश्न अडचणी बाबत तसेच गरीब कुटूंबाना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी परशुराम संघटनेने प्रयत्न करावेत असे आवाहन केले .
यावेळी उमेश गुरू विडोळीकर यांनी गत वर्षीच्या परशुराम जन्मोत्सव कार्यक्रमाचा लेखाजोखा सादर करून यावर्षी घेण्यात येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती देऊन खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले .
तसेच परशुरामाच्या उत्सव मूर्तीसाठी दानशूर समाजबांधवानी सहकार्य करण्याचे आवाहन केले .
कार्यक्रम भव्य दिव्य करण्यासाठी आर्थिक भार महत्वाचा आहे त्यासाठी सर्व समाजबांधवानी सढळ हस्ते मदत करून जन्मोत्सवातील सर्वच कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे .कारण सर्वांचा तन ,मन धनाने सहभाग असेल तरच कार्यक्रम भव्य दिव्य होईल . कारण केवळ परशुराम संघटना काहींच करू शकणार नाही .असे विचार मनोज दीक्षित यांनी व्यक्त केले .
ह भ प योगेश महाराज सा साळेगावकर ,योगेश कुलकर्णी ,संध्याताई चिटणीस यांनी यावेळी मनोगत मांडले . तसेच उपस्थित बांधवानी आपल्या मौलिक सूचना यावेळी देऊन चर्चेत सहभाग नोंदवला
यावेळी शहरातील सर्व स्तरातील समाजबांधव व भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .शेवटी बबलू मंडलिक यांनी उपस्थितांचे आभार मानले