झरीत भोई गल्लीतील शक्ती डीपी चार दिवसापासून बंद,महावितरणचे दुर्लक्ष

झरी,दि 09 ः
झरी ता.परभणी येथील भोई गल्लीतील शक्ती डीपी मागील चार दिवसापासून बंद असल्याने भोई गल्लीतील नागरीकांना आंधारात राहावे लागत असून पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
 डीपी बंद असूनही ग्राहकाची अनेक वेळा कर्मचारी व अधिकाऱ्यांना वारंवार फोनवर सूचना देऊनही डीपी आणण्यासाठी प्रयत्न केला जात नाही. गावठाण डीपी असल्यामुळे डी पी आणि ग्राहकास या घरामध्ये बोर असूनही पाणी मिळेना त्यामुळे तसेच पाण्यासाठी भोई गल्ली ची दारोदार फिरण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे डीपी वर असलेल्या सर्व  ग्राहकबिल भरलेले असल्यामुळे त्यांची तारांबळ होताना चित्र कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार थांबवण्याची मागणी होत आहे.

 

Comments (0)
Add Comment