सेलू,दि 19 ः
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष मा.अनिलजी सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच परभणी जिल्ह्य़ा तलाठी संघाची नुतन कार्यकारणी निवड साठी बैठक पार पडली.
यामध्ये एकमताने सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध करण्यात निवड करण्यात आली.
सदरील कार्यकारणीमध्ये जिल्ह्य़ा अध्यक्ष पदीशामसुदंर जनार्दन सर्यवंशी,सरचिटणीस: यशवंत नारायण सोडगीर,कार्याध्यक्ष पदी रामप्रसाद कोल्हे व मोहसीन पठाण,तर उपाध्यक्षपदी शंकर राठोड व धनंजय सोनुने,सहसचिव पदी माधव कुरेवाड व रमेश लटपटे
कोषाध्यक्ष धनंजय टेकाळे,हिशोब तपासनीस विजय राठोड यांची निवड करण्यात आली.
संघटक म्हणून भास्कर काकडे यांची निवड केली गेली .
यावेळी मुकुंद आष्टीकर, प्रशांत राखे, देवेंद्रसिंह चंदेल, विजय बोधले, भरत ढवळे आदींनी उपस्थित राहून परिश्रम घेतले.