सोलापूर – उद्याेगपतीच्या घरी झालेल्या भेटीवर बोलताना शरद पवार (sharad pawar) म्हणाले की, अजित पवार हा माझा पुतण्या (ajit pawar is my cousin) आहे. त्यामुळे कुटुंबातील व्यक्तीनं वडिलमाणसाला भेटण्यात काही गैर नाही. अजित पवार आणि माझी गुप्त बैठक (sharad pawar & ajit pawar secret meeting) झालेली नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासोबतच्या कालच्या भेटीसंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. अजित पवार हा माझा पुतण्या आहे. पवार कुटुंब जर बघितलं तर पवार कुटुंबात आता वडील माणूस मी आहे. वडील माणसाला कोण भेटायला आलं आणि वडील माणसानं कुणाला भेटायला बोलावलं तर हा चर्चेचा विषय होऊ शकत नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं.
भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर शरद पवार पुढे म्हणाले, “भाजपाबरोबर युती करणं, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. आमच्यातील काही सहकार्यांनी वेगळी भूमिका घेतली आहे. त्यांच्यात काही परिवर्तन होईल का? असा प्रयत्न आमचे काही हितचिंतक करत आहेत. त्यासाठी ते सुसंवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मी भूमिका मांडतो की, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाबरोबर जाणार नाही.”