शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा संपन्न

माजी विद्यार्थ्यांनी दिला आठवणींना उजाळा

 

सेलू / प्रतिनिधी – येथील कै सौ राधाबाई किशनराव कान्हेकर शारदा विद्यालयात दि. 20.डिसेंबर रोजी माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .

 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष राम पाटील यांची उपस्थिती होती .तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अध्यक्ष मुंजाभाऊ भिसे , प्राचार्य डॉ ए एम डख, सचिव चंद्रप्रकाश सांगतानी, संचालक प्रल्हादराव कान्हेकर , चंद्रशेखर नावाडे यांची उपस्थिती होती.प्रारंभी लेझीम पथकाचे आकर्षक प्रात्यक्षिक व पुष्पवृष्टी करून 2006 च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.”असे घडलो आम्ही ” या सदरात शाळेचे माजी विद्यार्थी रवी राक्षे, महेंद्र बनसोडे, निसार कुरेशी, संदीप वायाळ, नारायण कवडे, नय्यूम पठाण, सुरेखा आवटे , चंद्रकला बागल, विशाल कावळे आदी विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातील आठवणीं ना उजाळा देत आयुष्याच्या जडण घडणीत शाळेतील संस्कार , शिस्त व गुरुजनांच्या मार्गदर्श नाचे महत्व विषद केले.

 

प्रशालेच्या वतीने सर्व माजी विद्यार्थी व मान्यवरांचे फेटे बांधून स्वागत करण्यात आले. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला महापुरुषां च्या 20 प्रतिमा व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्वादिष्ट भोजना ची मेजवाणी दिली. शाळेच्या बांधकामा साठी 2 एकर जमीन उपलब्ध करून देणारे मझहर पठाण खॉसाब यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.मुंजाभाऊ भिसे, चंद्रशेखर नावाडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.तर राम पाटील यांनी अध्यक्षीय समारोपात शाळेतील ज्ञान व संस्कार हा विद्यार्थ्यांच्या जीवनातील अविस्मरणीय ठेवाच असतो असे स्पष्ट केले.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक डी.डी. शिंदे सुत्रसंचालन सुभाष मोहकरे, माजी विद्यार्थी स्वागत वाचान ए जी पाईकराव, विजय हिरे, संदीप जुमडे यांनी तर भरत रोडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी तेसाठी बी आर साखरे ,आर. व्ही. चव्हाण, आनंद देवधर , सौ.उषा कामठे, नानासाहेब भदर्गे, विजय अंभोरे, श्रीमती भारती मुळे, श्रीमती फुलारी, सौ साडेगावकर यांनी परिश्रम घेतले.

Comments (0)
Add Comment