परभणी,दि 06 ः
पेडगाव ग्रामपंचायत कार्यालयात सकाळी 8 वा. शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्त सरपंच सविताबाई हरकळ यांच्या हस्ते व तंटामुक्ती अध्यक्ष सुरेशनाना देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवप्रतीमेचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामाचा जयघोष करण्यात आला.कार्यक्रमाला पेडगावचे पोलीस पाटिल तावजी हरकळ, अंबादासराव (जिजा) सुरवसे, दादामामा देशमुख, आशिष हरकळ, ग्रामविकास अधिकारी श्री.प्रल्हाद सोळंके, मनोहरराव हरकळ, गंगाधर ढोके, दिपकमामा देशमुख, हरेशखान पठाण, पुरषोत्तम देशमुख, बाबासाहेब देशमुख, गोपाळ देशमुख, बाबुराव हकळ, विलासराव देशमुख, अनिल असोरे, तातेराव वरकड, शफी शेख, प्रकाश हरकळ आदींची उपस्थिती होती.