सेलू:घरात शॉर्टसर्किट झाल्याने आग लागून या आगीत गँस सिलेंडरने पेट घेत सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना सेलू तालूक्यातील आहेर बोरगाव येथे बूधवार ५ रोजी सकाळी ५ च्या सूमारास घडली असून या आगीत शेतक-याचे लाखोचे नूकसान झाले असून या आगीमूळे शेतक-याचा संसार उघड्यावर पडला आहे.
तालूक्यातील आहेर बोरगाव येथील हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांच्या राहत्या घरात लाईटचा साँर्टसर्किट होवून आग लागली.या आगीने रौद्ररूप धारण केले व या आगीत घरातील गँस सिलेंडरने पेट घेतला व त्या सिलेंडरचा स्फोट झाला असल्याने घरातील कापूस,रोख रक्कम,सोन्याचे दागिने ,ज्वारी,गहू,तूर व संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.यामध्ये घरात साठवूण ठेवलेला कापूस ७५ क्टिंटल बाजार भाव किंमत ५ लाख ६० हजार रूपये,घरात सोयाबीन विक्री करून ठेवलेली रोख रक्कम १ लाख ७५ हजार २०० रूपये,सोन्याचे दागीने यामध्ये नेकलेस,गंठन,एकदानी,वेल झूंबर,अंगठी असे एकूण ५ तोळे त्याची बाजार भाव किंमत ३ लाख ३० हजार तसेच संसार उपयोगी साहित्य,गहू,ज्वारी,तूर असे ९० हजार तसेच सर्व शासकिय व शैक्षणिक कागदपत्रे या आगीत जळाले आहे .या आगीत शेतक-याचे १२ लाख ६३ हजार २०० रूपयाचे नूकसान झाले आहे.सूदैवाने या स्फोटात कूठलीही जिवीतहानी झाली नाही.घटनेचा पंचनामा महसूलचे तलाठी,ग्रामसेवक व गँस एजन्शीचे प्रतिनिधी यांनी केला आहे.दरम्यान या घटनेमूळे शेतकरी हरिभाऊ विठ्ठलराव लहाने यांचा संसार उघड्यावर आला आहे .