श्री शिवाजी महाविद्यालयाची टॅलेंट सर्च परीक्षा रविवारी

परभणी,दि 23-
येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात येणारी श्री शिवाजी टॅलेंट सर्च परीक्षा येत्या रविवारी (दि.२९) रोजी आयोजित करण्यात आली आहे.
चालू शैक्षणिक वर्षात दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढण्याच्या उद्देशाने आयोजित केलेली ही परीक्षा रविवारी सकाळी अकरा ते बारा वाजेदरम्यान महाविद्यालयात होणार आहे. विद्यार्थी रविवार पर्यंत आपला प्रवेश निश्चित करू शकतात. यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेत नाव नोंदणी करायची आहे. परीक्षेसाठी दहावी काठिण्य पातळीवरचे प्रश्न असतील. सदरील परीक्षेत प्रथम येणाऱ्यास पाच हजार एक, द्वितीय येणाऱ्यास तीन हजार एक तर तृतीय येणाऱ्यास दोन हजार एक रुपये आणि प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे. तसेच वीस प्रोत्साहनपर बक्षिसांचा ही समावेश आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव,उपप्राचार्य प्रा.नारायण राऊत यांनी केले आहे.
सदरील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी प्रा. नंदकिशोर भरोसे,प्रा.एस.आर.पखाले, प्रा.पी.एच. कोल्हे, प्रा.सी.जी. लाटकर,प्रा.जी.एस. देशमुख, प्रा.पी.आर. सोळंके,प्रा.यु.टी.कोल्हे,प्रा. एस.के. लोंढे, प्रा. एम.पी. टाक यांच्याशी संपर्क साधावा.

Comments (0)
Add Comment