पूर्णा, प्रतिनिधी –
श्री गुरू बुद्धिस्वामी महाविद्यालयात भारतरत्न, शिक्षण तज्ञ, घटना तज्ञ, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. श्री गुरू बुद्धिस्वामी शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव तथा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य प्राध्यापक गोविंद कदम यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
याप्रसंगी प्राचार्य डॉ. के. राजकुमार, उपप्राचार्य डॉ. संजय दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे सदरील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉ. व्यंकट कदम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ.संतोष चांडोळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी डॉ. शेख राजू, प्रा. नामदेव पंडित, प्रा राजेश परलेकर, प्रा.वाघमारे, प्रा. साखरे, कार्यालयीन अधिक्षक श्री अरुण डुब्बेवार , श्री अशोक कदम, श्री विनायक कदम, श्री मंचक वळसे, श्री गजानन भालेराव तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.