सेलू / नारायण पाटील – येथील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील इयत्ता सहावी वर्गातील विद्यार्थी सय्यद अरमान सय्यद अली याने जानेवारी महिन्यात घेतलेल्या भारत टॅलेंट सर्च परीक्षेत घवघवीत यश संपादन करून सेलू तालुक्यात प्रथम तर राज्य गुणवत्ता यादीत 31 वा क्रमांक पटकवला आहे.या परीक्षेला संपूर्ण राज्यातून जवळपास 78756 विद्यार्थी सहभागी झाले होते.
एकूण 150 पैकी 122 गुण म्हणजेच 81.33 टक्के गुण त्याने मिळवले आहेत तसेच शाळेतील 35 विद्यार्थ्यापैकी 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांना bts परीक्षा प्रमुख योगेश ढवारे, अमीता जवळेकर,शुभांगी भाग्यवंत, धीरज दूधगोंडे यांचे मार्गदर्शन लाभले.
विद्यार्थ्यांच्या या यशाबाबत संस्थेचे सचिव महेश खारकर, अध्यक्ष एड अनिरुद्ध जोशी यांचे सह केंद्र प्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, बालासाहेब हळणे आदिनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.