भव्य शोभयात्रेने होणार श्रीरामकथेला प्रारंभ

-गोविंददेवगिरी महाराजांच्या सुश्राव्य वाणीतून उद्यापासून सुरवात

 

 

सेलू / प्रतिनिधी – अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत प.पू.स्वामी गोविंददेवगिरी महाराजांच्या अमृततुल्य व रसाळ वाणी मधून मराठी मधून श्रीराम कथेचा लाभ भाविकांना होणार आहे. येथील नूतन विद्यालयामागील क्रीडांगणावर” हनुमानगढ” या ठिकाणी ही कथा संपन्न होणार आहे.

 

 

दरम्यान दि 15 रोजी सकाळी आठ वाजता शिर्डीचे संत व शहराचे ग्रामदैवत असलेल्या केशवराज बाबासाहेब मंदिर पासून भव्य शोभायात्रा निघणार आहे. तर बालाजी मंदिर येथे शोभयात्रेचा समारोप होणार आहे.शोभायात्रेत बँड पथक ,धर्म ध्वज व अश्व, मारोती ध्वजधारी युवक ,श्री राम उत्सव मूर्ती ,श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे लेझीम पथक, कलशधारी माता भगिनी ,तुळस धारी माता भगिनी, सेलूतील सर्व महिला भजनी मंडळ , सहभागी माता-भगिनी, वारकरी भजनी मंडळ मानवत , ग्रंथ दिंडी, वारकरी भजनी मंडळ वालूर ,वेद विद्यालयाचे विद्यार्थी , स्वामीजींचा रथ या क्रमाने सहभाग असणार आहे.तसेच शोभयात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी संत महंतांच्या,महापुरुषांच्या वेशातील वेशभूषेत आठ ठिकाणी झाकी सादरीकरण विविध शाळांच्या वतीने करण्यात येणार आहे.

 

या श्रीराम कथेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.अगदी काटेकोर नियोजन करण्यात येत आहे .या रामकथेसाठी भव्य मंडप उभारण्यात आला असून कथेस येणाऱ्या भाविक भक्तांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही .याची आयोजकांच्या वतीने कटाक्षाने काळजी घेतली जात आहे . या कथा मंडपात महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे .कथे नंतर सर्व उपस्थित भाविकांना प्रसाद वाटप केले जाणार असून बाहेरगावाहून येणाऱ्या भक्तांसाठी बाहेती मंगल कार्यालयात भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे .दररोज आरतीसाठी ४० ते ५० यजमानांची व्यवस्था करण्यात आली आहे . तसेच २१/१०/२४रोजी रात्री ८ वाजता श्रद्धेय गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांची भजन संध्या होणार आहे . तरी सर्वांच्या सहकार्याने होतअसलेल्या या ज्ञानरुपी महायज्ञात सर्वांनी रामकथा श्रवणाचा लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रमाचे आयोजक जयप्रकाश ,विजय बद्रीनारायणजी बिहाणी,अविनाश बिहाणी तसेच बिहाणी परिवाराच्या व श्रीराम कथा समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आले आहे .

Comments (0)
Add Comment