श्री संत भोजाजी महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न

हिंगणघाट,दि 28  (प्रतिनिधी)ः
श्री गुरूदेव सेवा मंडळ शहर व तालुका समन्वय समिती हिंगणघाट च्या वतिने सामुदायिक प्रार्थना मंदीर राष्ट्रसंत तुकडोजी चौक येथे भोेजाजी महाराज पुण्यतिथि सोहळा संपन्न झाला. प्रथम दिप प्रज्वलन करून गुरूदेवाच्या आसणास व श्री संत भोजाजी महाराजांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.
या प्रसंगावर माहिती सादर करताना शहरसेवाधिकारी दिनेश हिवंज म्हणाले की आजनसरा हे वर्धा जिल्हातील छोटस गाव परंतु संत भोजाजीच्या पावन पद स्पर्शाने त्या गावाची आता पंढरी झाली आहे.
आजनसरा येथील कोसुरकर कुटुंबा मध्ये संत भोजाजीचा जन्म झाला लहाणपना पासुनच त्यांना विठ्ठल भक्तीचा लळा होता पुढे पंढरपुरचा विठ्ठल हे त्यांचे आराध्य दैवत ठरले
संत भोजाजी बद्दल अनेक आख्यायिका ऐकायला मिळतात एकदा असे झाले की काही भक्त मंडळी पंढरीला गेली व नावेने प्रवास सुरू झाला व त्या नावेला भले मोठे छिद्र पडले नाव बुडणार म्हणुन भक्तांनी संत भोजाजीचा धावा सुरू केला आणि नाव सुखरूप किनारावर पोहचली अशी मान्यता आहे, आजही हजारो भक्तमंडळी पुरणपोळीचा स्वयंपाक घेवुन आजणसरा गावी येतात आणि आजही भक्तांना तेथे श्रध्देचे फळ मिळते असे सांगितले जाते.
कार्यक्रमाची सांगता सामुदायिक प्रार्थनेने झाली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जेष्ठ गुरूदेव सेवक नितीन कोरडे रामकृष्ण सुर, अक्षय हिवंज दिलीप ताकवाले, दिपक वांढरे जगदिश वांढरे, डॉ किशोर मख वेेदांत तळवेकर सुंदराबाई ठाकुर व स्थानिक नागरिकांची उपस्थिति होती.

Comments (0)
Add Comment